Pune : मुलाला भेटण्यास सासरी गेलेल्या आईला पतीसह सासू सासऱ्यांकडून बेदम मारहाण; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा

une-husband-beat-wife

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाला भेटण्यास सासरी गेलेल्या आईला पतीसह सासू सासऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून त्यांनी मारहाण केली. लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पुनम प्रकाश जगताप (वय 26 रा. सध्या आळंदी म्हातोबाची) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती प्रकाश जगताप, सासू शोभा जगताप, सासरे बाळासाहेब जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आळंदी म्हातोबा येथील आहेत. त्यांचा प्रकाश यांच्यासोबत विवाह झाला आहे. त्या रायवाडीत सासरी राहत होत्या. पण, कौटुंबिक वादातून त्या काही महिन्यांपासून कुटुंबातील माहेरी राहत. मात्र, त्यांचा लहान मुलगा सासरीच आहे. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या भावाला घेऊन सासरी त्यांच्या लहान मुलाला भेटण्यास गेल्या होत्या.

त्यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये मुलाचा व्हिडीओ काढला. त्याचा राग आल्याने पतीने त्यांच्या कानाखाली मारली व मोबाईल फेकून दिला. तर, सासुने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले आणि सासऱ्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादीचा भाऊ अमोल जाधव यास जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक जयंत हंचाटे करत आहेत.