Pune : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा पाठलाग; हॉटेलमध्ये बायको अन् मित्र दिसल्यानंतर केली बेदम मारहण, पुढं झालं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने पत्नीचा पाठलाग करत पतीने तिला तिच्या एका मित्रासोबत हॉटेलात गाठल्यानंतर पतीने इतर दोघांच्या मदतीने तीला आणि मित्राला बेदम मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे. जानेवारीत हा प्रकार घडला असून, न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश ( वय 32, रा.न्यू दिल्ली), सौरभ गौर व आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 27 जानेवारी 2021 रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिलेचा आकाश हा पती आहे. दरम्यान पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिचा पाठलाग करत होता. यावेळी पत्नी व तीचा मित्र जगप्रकाश पांडे याच्यासोबत पुण्यात आली होती. ती नगर रस्त्यावरील एका आलिशान हॉटेलमध्ये मित्रासोबत उतरली. ती तीच्या मित्राच्या खोलीत सामान घेण्यासाठी गेली. पण त्याच वेळी पती व इतर दोघे तेथे आले आणि त्यानंतर त्याने चारित्र्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सोबत आलेल्या दोघा आरोपींनी पती आकाश याला चिथावणी देत तिला ठार मारण्यास सांगितले. यानंतर आकाशने तीच्या तोंडावर व पोटावर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी मित्र जगप्रसाद हा सोडवण्यास आला. तर त्यालाही सर्वांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी यांनी रुममधून जीव वाचवण्यासाठी पळ काढला पण, यातील एका आरोपीने तीला पाठिमागून पकडून विनयभंग केला. यानंतर आकाशने तीला गादीवर पाडून तीचा गळा दाबला. तीने प्रतिकार करत पोलीस नियंत्रण कक्षास फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीचा मोबाईल फेकून देऊन तीला पुन्हा मारहाण केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

दरम्यान, आकाश हा इंटेलिजन्स ब्युरोत अधिकारी होता, त्याने काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आहे. आता तो UPSC परिक्षेची तयारी करत आहे. तर फिर्यादी महिला बॅंकेत नोकरी करत होती. दोघेही हरियाणात रहात होते. फिर्यादी शिक्षणानिमीत्त पुण्यात राहत होती. यामुळे ती मित्रांना भेटायचे असल्याचे सांगत पुण्यात येत होती. मात्र पती आकाशला तीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तीचा माग काढत ती रहात असलेल्या हॉटेलमध्येच तिला व मित्राला पकडले.