Pune : तोतया पोलिसाकडे आढळलं पुणे पोलिसांचं ओळखपत्र, गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात पोलिसांचा गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतया पोलिसाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याजवळ पुणे पोलिसांचे बनावट ओळखपत्र होते.

इम्तियाज इंद्रिस मेमन (वय 41, रा. तिरुपती गृहरचना सोसायटी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक अंकुश जोगदंडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

pune-city

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हे गुन्हे शाखेच्या युनिट पाच येथे नेमणुकीस आहेत. दरम्यान एक व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्याना एक तोतया पोलीस खंडणी मागत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला देण्यात आली. गुन्हे शाखेने त्याचा शोध घेतला. यावेळी मेमन हा महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश तसेच पुणे पोलिसांचे ओळखपत्र घेऊन फिरत असल्याचे समजले. यानुसार त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर 2004 मध्ये मारहाणीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तो एक हॉटेल चालवत होता, असे सांगण्यात आले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.