Pune : पोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अ‍ॅप्लीकेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी लागू केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-पाससाठी परवानगीचे तब्बल 1 लाख 11 हजार अर्ज पोलिसांकडे आले. मात्र, त्यापैकी फक्त 28 हजार 698 अर्ज मंजूर केले. तर त्रुटी असणारे 83 हजार अर्ज फेटाळले आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जे अर्ज नाकारण्यात आले आहेत त्या अर्जाचा परत Review घेतला जाणार असून, ज्यांचे अर्ज प्रलंबित किंवा नाकारले गेले आहेत त्यांनी @CPPUNECITY या ट्विटरवर टोकन नंबर टाकावा, असे अहवान केले आहे.

शासनाने राज्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी (दि. २३ एप्रिल) राज्यात (जिल्हा) प्रवासास बंदी घातली आहे. अत्यावश्यक तसेच वैध कारणाशिवाय नागरिकांना प्रवास करता येत नाही. प्रवास करण्यास पोलिसांचा ई-पास घेणे बंधनकारक आहे. ई-पासासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून covid19.mhpolice.in ही वेबसाईट तयार केली आहे. यावेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. पोलिस विभाग अर्ज आल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे पाहून वैध कारण असल्यास त्यास परवानगी देतात.

शहरात ही सुविधा सुरू केल्यानंतर (१७ दिवसात) पुण्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यांसाठी 1 लाख 5 हजार अर्ज आले आहे. यात 27 हजार 592 जणांस ई-पास मंजूर करण्यात आला आहे. त्यात वैद्यकीय कारणांसाठी सर्वाधिक नागरिकांना ई-पास मंजूर केला आहे. तर, आवश्यक कागदपत्रे नसल्याने तसेच कारण आवश्यक नसल्याने 57 हजार नागरिकांचे पास मंजूर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून आता नाकारण्यात आलेल्या अर्जाचा Review घेतला जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा नाकारले गेले आहेत, अशांनी त्यांचा टोकन नंबर हा @CPPUNECITY या ट्विटर टाकण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विमानप्रवास करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा तिकिट जोडल्यानंतर त्यांना तात्काळ पास दिला जाणार आहे.

तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे. आवश्यकता असेल तर बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

नाकारण्यात आलेल्या अर्जात ‘या’ प्रकारच्या आहेत चुका; अ‍ॅप्लीकेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका

  1.  अर्ज करताना स्वतःचे आणि सोबत असणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र जोडले जात नाहीत.
  2. अर्ज करताना Covid चा निगेटिव्ह अहवाल किंवा फिट असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट जोडले जात नसल्याचे दिसून आले आहे.
  3. प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहात त्या संबंधित कागदपत्रे जोडली जात नाहीत.
  4. जोडलेले कागदपत्रे ही पीडीएफ स्वरूपात नसतात. त्या अर्जावरचा फोटो हा व्यवस्थित नसतो.
  5. प्रवास करतानाचे कारण हे अर्धवट असते आणि सध्या राहत असलेला पत्ता अर्धवट असतो.