Pune : परस्त्रीयांशी अनैतिक संबंध ठेवत दुसरे लग्न करून पत्नीला बेकायदेशीर तलाक, पतीवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   परस्त्रियांशी अनैतिक संबंध व परस्पर दुसरे लग्न करून पत्नीला मानसिक त्रास देत बेकायदेशीर तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती हक्कीमुद्दीन अली हुसेन ताटीवाला (इय 52) याच्यावर मुस्लिम महिला अधिनियम 2019 चे कलम 4 आणि इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढवा खुर्द परिसरात राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह पती हक्कीमुद्दीन याच्याशी झालेला आहे. दरम्यान बाहेर परस्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवले. तर त्याची कसलीही कल्पना म देता फिर्यादी यांच्या गुपचूप दुसरे लग्न देखील केले. त्यानंतर फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. तर त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर जावे ठार मारण्याची धमकी देऊन कोणतेही ठोस कारण नसताना बेकायदेशीर तलाक दिला असल्याचे फिर्यादी लत म्हटले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like