Pune : थोर-महात्म्यांच्या विचारांचे अनुकरण करा – पोलीस निरीक्षक कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून प्रत्येकाने घरामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला पाहिजे. त्यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य हाती घेऊन समाजातील पिचलेल्या घटकांना मदतीचा हात पुढे करण्याची कोरोना महामारीमुळे वेळ आली आहे. थोर-महात्म्यांच्या विचार आचरणात आणावेत, असे आवाहन हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी केले.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षा मिनाझ मेमन, हडपसर विधानसभा मतदारसंघ रिपाइं अध्यक्ष संतोष खरात, रामभाऊ कर्वे, महादेव कांबळे, राजू कांबळे, सुभाष सरवदे, तुषार आरणे, मीना गाल्टे, आशिष आल्हाट, राजू गायकवाड, पितांबर धिवार आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कदम म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून आजाराला आमंत्रण देऊ नये. शासनाच्या नियमांचे पालन करावे, विधायक काम करून समाजामध्ये चांगला संदेश द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.