Pune : ‘कोरोना’च्या उपचारांसाठी ‘करार’ केलेल्या खासगी हॉस्पीटलमधील ‘बेड’चे ‘नियोजन’ व ‘नियंत्रण’ करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती, जाणून घ्या फोन नंबर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेने कोविड १९ उपचारांसाठी करार केलेल्या खाजगी हॉस्पीटलमधील बेड चे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी परिमंडळ निहाय समन्वय अधिकारी, विभागीय अधिकारी तसेच नेमून दिलेल्या हॉस्पीटलमध्ये तीन शिफ्टमधे तीन स्वतंत्र कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. करार केलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये तीनही शिफ्टसाठी तीन कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि समन्वयक अधिकारी यांनी बेडस्चे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी आदर्श पद्धतीही लागू केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने कोरोना बेडस् उपलब्ध व्हावे यासाठी समन्वय अधिकार्‍यांनी सकाळ, दुपार आणि रात्रपाळीमध्ये रोटेशननुसार नेमून दिलेल्या खाजगी हॉस्पीटलमध्ये उपस्थित राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.  संबधित विभागीय वैद्यकीय अधिकार्‍यांसमवेत सदर रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देउन तेथील प्रत्येक बेडस्ची माहिती घ्यावी. सदर बेडस्च्या दर्शनी भागावर पीएमसी ऑक्युपाईड असे लेबल लावावे. संबधित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची व सुविधायुक्त बेडस्ची तपशीलवार माहिती डॅशबोर्डवर भरण्यात यावी. महापालिकेच्या माध्यमातून उपचार घेत असलेल्या रुग्णाला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर सदर बेडवर महापालिकेचा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून येणार्‍या रुग्णालाच दाखल करण्यात यावे. अन्य मार्गाने अतितातडी म्हणून परस्पर दाखल झालेल्या रुग्णाची माहिती तत्काळ कंट्रोल रुमला कळवावी व डॅशबोर्डवरील माहितीही तातडीने अपडेट करावी. हॉस्पीटलमध्ये दाखल रुग्ण व डिस्चार्ज रुग्णाची माहिती तात्काळ डॅशबोर्डवर अद्ययावत होईल याची खातरजमा समन्वय अधिकार्‍याने करावी. यावर सनियंत्रण अधिकारी म्हणून समन्वय अधिकारी व विभागीय वैद्यकिय अधिकारी यांच्यावर उपजिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण राहाणार आहे.

एन.एम. वाडिया इन्स्टिट्यूट ऑन कार्डीओलॉजी, ससून रोड / रायझिंग मेडिकेअर हॉस्पीटल, खराडी / श्री हॉस्पीटल क्रिटीकेअर आणि ट्रोमा सेंटर, खराडी / कोलंबिया एशिया हॉस्पीटल, खराडी.
नियंत्रक अधिकारी – अविनाश हदगल, उपजिल्हाधिकारी (मो.नं.७०२८४२५२५६)
विभागीय वैद्यकीय अधिकारी – रेखा गलांडे (मो.नं. ९६८९९३१९२९)

लोकमान्य हॉस्पीटल, गोखलेनगर/ सह्याद्री हॉस्पीटल, कर्वेरोड / परमार हॉस्पीटल, औंध / ज्युपिटर हॉस्पीटल, औंध / ऑयस्टर ऍन्ड पर्ल हॉस्पीटल, शिवाजीनगर
नियंत्रक अधिकारी – सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (मो.नं. ७७२२०३००३० ) / विभागीय
वैद्यकीय अधिकारी – डॉ. संतोष मुळे ( मो.नं.९६८९९३८८०९)

औरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, आंबेगाव / मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, नर्‍हे / सहवास मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल / संजीवन हॉस्पीटल, कर्वेरोड / अनुप हॉस्पीटल, दत्तवाडी
नियंत्रक अधिकारी – श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, प्रकल्प, पुणे मनपा. – (मो.नं. ९६८८३१३८०) /
विभागीय वैद्यकीय अधिकारी – डॉ. दिपक पखाले (मो.नं.९६८९९३१५३१)

रुबी हॉल क्लिनिक, वानवडी / शिवम हॉस्पीटल, फुरसुंगी / विल्लो पूनावाला मेमोरिअल हॉस्पीटल/ मेडिकेअर हॉस्पीटल, सातेसतरा नळी / रेमिडी हॉस्पीटल, हडपसर
नियंत्रक अधिकारी – मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका – (मो.नं. ९६८९९३१७७१)
विभागीय वैद्यकीय अधिकारी – डॉ. दिनेश बेंडे (मो.नं.९६८९९३१०८४)

सुर्या सह्याद्री हॉस्पीटल/ शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीक हॉस्पीटल/ सह्याद्री हॉस्पीटल, बिबवेवाडी / मीरा हॉस्पीटल, शंकरशेट रोड
नियंत्रक अधिकारी – डॉ. भरत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (मो.नं. ९८५०७९११११) /विभागीय वैद्यकिय अधिकारी – डॉ. राजेश दिघे (मो.नं. ९६८९९३७६३८)