Pune : बिबवेवाडीत पुन्हा एकदा टोळक्याकडून मध्यरात्री गाड्यांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडीत पुन्हा एकदा टोळक्याने मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली आहे. 8 ते 9 जणांच्या टोळक्याने हा राडा घातला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात लक्ष्मण पळसकर (वय 55) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येथील शंकर मंदिर परिसरात राहतात. रस्त्यावर दुचाकी व रिक्षा लावलेल्या असतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अचनकन 8 ते 9 जणांचे टोळके हातात शस्त्रे घेऊन आले. त्यांनी तुफान राडा घालत त्यांनी फिर्यादी यांच्या दुचाकी व इतर एका रिक्षाची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.