Pune : बोपदेव घाटात 3 दुचाकीवरून आलेल्यांनी तरूणाला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   बोपदेव घाटात 3 दुचाकीवरुन आलेल्या 8 जणांनी एका दुचाकीस्वाराला लुटल्याचा खळबळजनक प्रकार रात्री घडला आहे. बोपदेव घाटात वारंवार या घटना घडत असून, दोरडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

याप्रकरणी विकास दरेकर (वय 35, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन दुचाकीवर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा बुद्रुक परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान ते हिवरे गाव येथून घरी येण्यास निघाले होते. ते दुचाकीवर होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटात आल्यानंतर ते येवलेवाडी येत असताना अचानक गारवा हॉटेल्सच्या जवळ पाठीमागून तीन दुचाकीवर 8 दरोडेखोर आले. त्यांनी दुचाकी अडवत त्यांच्या पाठीवर असलेली काळी बॅग घेऊन त्यांच्याजवळील 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला आहे. या घटनेमुळे फिर्यादी हे भयंकर घाबरले होते. त्यांनी भीतभितच कोंढवा पोलीस ठाणे गाठले. तसेच घटनेची माहिती दिली. ही मिळताच झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील आणि पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.