Pune : हडपसरमध्ये आकाशवाणीसमोरील मोकळ्या जागेत गवत पेटले

पुणे – हडपसरमध्ये आकाशवाणी समोरील मोकळ्या जागेत आज (गुरुवार, दि. 13 मे) दुपारी अचानक गवत पेटले. वाऱ्यामुळे आग भडकली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि वेळीच आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाऱ्यामुळे आगीचा झळा नागरिकांना दूर लोटत होत्या.

दरम्यान, आगीचा लागलेल्या ठिकाणापासून सिरम कंपनी जवळ आहे. मात्र, कंपनीला काहीही धोका नसल्याच सांगण्यात आले. आग लागलेल्या 23 एकरचा प्लॉट आहे. जागा मोकळी असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलं आहे. याच गवताने पेट घेतल्याने आग पसरली होती. उन्हाच्या तडाख्याने आग आणखी पेटत असल्यामुळे घटनास्थळी आगीचा दुसरा बंबही बोलावण्यात आला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न आग विझविली. मोकळ्या परिसरात ही आग नेमकी लागली याचा पोलीस शोध घेत आहेत. गवत पेटले होते, ते अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आटोक्यात आणले, असे हडपसर पोलिसांनी सांगितले.