Pune : पुण्यात मुलानेच केलं आईशी घृणास्पद कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या माहेर घरात किळसवाणा प्रकार समोर आला असून, मुलानेच आईशी शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न करत त्यांना अश्लील भाषेत बोलून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार २४ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा व्यसनांच्या आहारी गेला आहे. तो सतत नशेत असतो. दरम्यान त्याने गुरुवारी हा प्रकार केला. आई काम करत असताना त्याने आईशी अश्लील वर्तन केले. तसेच त्यांना बोलून इतर नातेवाईकांना शिवीगाळ केली आहे. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत या मुलाला अटक केली आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.