पुण्यात भररस्त्यातच तरूणीचा विनयभंग, नराधमाने केले सदाशिव पेठेतच अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सुरक्षित समजल्या जाणार्‍या सदाशिव पेठेतच महाविद्यालयीन तरुणींचा एका लिंगपिसाट नराधमाने भररस्त्यात अश्लील चाळेकरून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी 8 वाजता हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी सदाशिव पेठेत राहण्यास आहेत. दरम्यान, पिडीत तरुणी आणि तिची मैत्रिण शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खासगी क्लासला जात होत्या. त्यावेळी 25 ते 30 वयोगाटीतल लिंगपिसाट तरूण रस्त्याच्या कडेला उभा राहून त्यांच्याकडे पहात अश्लील आवाज काढू लागला.

तसेच, अंगावरचे कपडे काढून त्याने तरुणींकडे पाहून अश्लील हावभाव केले. तरूणी भिती पोटी तेथून घाई-गडबडीत निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आरोपीचे वर्णनावरून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.