पुणे : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुंड तडीपार

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

आगामी सण व उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोहियानगर येथील सराईत गुंड शतुल प्रभाकर नाडे (वय-२९ रा. लोहियानगर) याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B076Y4P7NQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17ce1d85-8b6d-11e8-bd36-190ef539496a’]

खडक पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शतुल नाडे याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा १ गुन्हा आणि चंदननगर पोलीस ठाण्यात पिस्तुल बाळगल्याप्रकरणी १ गुन्हा दाखल आहे़. तसेच खडक पोलीस ठाण्यात गर्दी जमवून मारामारी केल्याचे २ गुन्हे दाखल आहेत़. २०१५ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्यात काहीही सुधारणा न झाल्याने त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्याकडे पाठविला.  तेली यांनी त्याला मान्यता देऊन त्याला एक वर्षांसाठी तडीपार केले आहे.