पुण्यातील ‘या’ 10 पोलीस ठाण्याच्या परिसरात 23 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत फक्त ‘दूध’ आणि ‘औषधे’च मिळणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील 10 पोलिस ठाण्यांच्याहद्दीतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात पोलिसांनी आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. या परिसरात उद्या (२३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत) पूर्णपणे मनाई आदेश लागू केले असून केवळ सकाळी 10 ते दुपारी १२ पर्यंत या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी दिली आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी  मनाई आदेश काढले आहेत. त्यामुळे आता या भागात औषधे व दूध वगळता सर्व प्रकारचा विक्रीस मनाई केली आहे. मंगळवारी रात्री हे आदेश काढले. दुधाच्या वाहतुकीवर बंधन घालण्यात आले नसले तरी दूध विक्रीची घरपोच सेवा देता येणार नाही.

हे आहेत प्रतिबंधित क्षेत्र

परिमंडळ 1

-समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसरात हे आदेश असणार आहेत.

परिमंडळ 2

-स्वारगेट  पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लाॅट

-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता

परिमंडळ 3

-दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन

परिमंडळ 4

-येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ

-खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी

परिमंडळ 5

-कोंढवा पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग

-वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८.