Pune : उरुळी कांचनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने भरला सज्जड दम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे दुकानदार आणि नागरिकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे वृत्त पोलीसनामामध्ये प्रकाशित झाले. सोमवारी (दि. 19 एप्रिल) पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्र येत धडक रॅली काढून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सज्जड दम दिला, तर नागरिकांना रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन केले.

विकेंडच्या दुसऱ्या टप्प्यात (रविवार, दि. 18 एप्रिल) उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात लॉकडाऊनचा फज्जा असे वृत्त पोलीसनामामध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत आज रॅली काढली. लॉकडाऊनच्या काळात दुकाने उघडी ठेवली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे प्रबोधन केले. तसेच नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.

दरम्यान, दुकानदारांनी शटर बंद केले आहेत की नाही, याचीसुद्धा खातरजमा केल्याने दुकानदारांची चांगली तारांबळ उडाली आहे. आज दुकानदारांनी नियमावर बोट ठेवून व्यवहार केल्यामुळे एकाही दुकानेच शटर अर्धवट वा मागच्या दाराने व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच, नागरिकांनीही कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही, असा निश्चय केला. त्यामुळे राज्य शासनाच्या ब्रेक द चैन याला निश्चितच यश मिळेल, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.