पुण्यात भुरट्या चोरट्यांची ‘दहशत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या, सोन साखळी अन् लुटमारीसोबतच भुरट्या चोर्‍यांनी तुफान दहशत माजवली असून, हडपसर परिसरात पीएमटी प्रवासात चोरट्यांनी पुन्हा ज्येष्ठ महिलेला लक्षकरून हातातील 40 हजार रुपयांची बांगडी चोरली आहे. तर, विमानतळ परिसरात दोन वेगळ्या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 64 वर्षीय सुनंदा राऊत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या गाडीतळ ते भेकराईनगर आळंदी पीएमटीत बसल्या होत्या. बसमध्ये गर्दी होती. त्यादरम्यान वैदूवाडी बसस्टॉपला आल्यानंतर त्यांना हातातील 40 हजार रुपयांची बांगडी चोरून नेल्याचे लक्षात आले. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दररोज बस प्रवासात चोर्‍या करत आहेत. मात्र, पोलिसांना ते सापडत नसल्याचे दिसत आहे.

तेसच, विमानतळ पोलीस ठाण्यात अनुराग रागी (वय 38, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उमेश वसंत मंजुळे (वय 32, रा. एअरपोर्ट रोड) व कृष्णा साबळे (वय 28, रा. धानोरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

संजयपार्क परिसरात फिर्यादींनी ठेवलेले 8 हजार रुपयांचे केबल वायर ठेवले होते. ते वायर या दोघांनी चोरू करून नेले. फिर्यादी रागी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी माहिती या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

तर, दुसरी घटनाही विमानतळमधील मार्केट सिटी मॉलमध्ये घडली आहे. याठिकाणी आलेल्या ग्राहकाने त्यांची बॅग बॅगेज रूममधील स्टेलकेस नं. 10 मध्ये ठेवली होती. ती अज्ञात चोरट्यांनी बॅग चोरून नेली. बॅगेत महत्वाची कागदपत्रे तसेच काही वस्तू असा 17 हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत मॉलचे सुरक्षा अधिकारी गणेश कांबळे (वय 35) यांनी विमानतळ पोलीसांकडे तक्रार दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/