इंदापूरमध्ये बहीण-भावांचा संशयास्पद मृत्यू

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव गाव जवळ माळेवाडी येथे दोन मुलांचा संशियतपणे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रतिक महेश बनसुडे (वय: पाच) आणि कार्तिकी महेश बनसुडे (वय:आठ महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या बहीण भावांची नावे आहेत. यापैकी प्रतीक दिव्यांग असल्याचे समजते.

पळसदेव जवळील बहीण भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढत आहे. मृत मुलांच्या आज्जीने इंदापूर पोलिस ठाण्यात जबाब देताना म्हणाले आहे की,” मुलांची आई सुरेखा महेश बनसोडे ही त्या पाण्याच्या टाकीत होती व तिने तिच्या पोटाजवळ ही दोन्ही मुले धरुन ठेवलेल्या अवस्थेत त्यांना आढळले. ही घटना घडली तेव्हा घरात इतर कोणीही नव्हते. त्यामुळे या बुडून मृत पावलेल्या मुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. या मुलांच्या आईवर इंदापूरमध्ये खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असून इंदापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

You might also like