Pune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश देण्यात आले. एकूण 1 हजार 289 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात सहाय्यक उपनिरीक्षक ते शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शहर पोलीस दलात दरवर्षी टर्म पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. तस या बदल्यां जवळ येताच प्रत्येकजण इच्छित स्थळी बदली होण्यासाठी फिल्डिंग लावत असतात. तर अनेकजण बदली होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. त्यामुळे या बडल्याना विशेष महत्व असते. याकडे पोलीस दलाचे लक्ष असते. पण त्याहून काही अधिकारी आणि बाहेरच्या हितचिंतकांचेही डोळे लागलेले असतात. गेल्या काही दिवसापासून या बदल्यांचे काम सुरू होते. पण त्या झाल्या नव्हत्या. नव्या आयुक्तांनी मात्र नियमानुसार प्रथम बदल्या केल्या आहेत. यात कोणालाही फिल्डिंग लावण्यास चान्स न देता स्वतः बदल्या केल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like