Pune : वाहतूक शाखेतील 3 सहाय्यक आयुक्तांच्या (ACP) अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   वाहतूक शाखेत अंतर्गत तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आज वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त एस. एम. देशमुख यांनी परिमंडळ एकपदी नियुक्ती केली आहे. तर परिमंडळ तीनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

तर एन. पी. वाकुडे यांची परिमंडळ दोनपदी नेमणूक केली असून, परिमंडळ पाचचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. तसेच सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांना परिमंडळ चारपदी नियुक्ती केली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कामकाजाची सुरुवात केली आहे. त्यांनी आज शहरातील वाहतुकीची माहिती घेतली. तसेच मंजूर संख्या, सध्याचे मनुष्यबळ तसेच कमतरता आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या विभागांची माहिती घेतली आहे. त्यानंतर आवश्यक असणारे बदल करण्यात येणार आहेत.