पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचे १९ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेकडून १८ लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचे ५५७.६४ ग्रॅम वजनाची तीन बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेले सोने बँकॉक येथून तस्करी करून आणले असल्याचा संशय सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. उषा सिंग असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

स्पाईस जेट कंपनीच्या विमानातून ही महिला १० जुलै रोजी गोवा येथून पुणे विमानतळावर आली होती. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी महिलेची तपासणी केली असता तिच्याकडे १८ लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचे ५५७.६४ ग्रॅम सोन्याची तीन बिस्कीटे सापडली. ही बिस्कीटे काळ्या रंगाची चिकट पट्टी लावून बुटामध्ये लपवली होती.

गोव्यातून पुण्यात आलेल्या विमानाचा मार्ग बँकॉक ते कोलकाता होता. कोलकातामध्ये आल्यानंतर हे विमानाची देशांतर्गत वाहतुक सुरू झाली. कोलाकाता-बंगलुरू-गोवा-पुणे असा या विमानाचा मार्ग होता. विमानातील स्वच्छतागृहामध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते. हि महिला गोव्यामध्ये विमानात चढल्यानंतर तिने हे सोने बुटामध्ये लपविले. या बिस्कीटांवर मेटालर, सिंगापुर असे लिहिले आहे, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या