Pune International Airport Lohegaon | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटामधून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी, 35 लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune International Airport Lohegaon | आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या तस्करीची (Gold Smuggling) प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करीत असतात. अशाच प्रकारची एक घटना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport Lohegaon) उघडकीस (Pune Crime) आली आहे. दुबईहून (Dubai) पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आले आहे.

 

दुबईहून पुण्यात आलेल्या प्रवाशाने तब्बल 34 लाख 81 हजारांच्या सोन्याच्या बिस्कीटांची (Gold Biscuits) तस्करी आपल्या पायातील बुटामधून केल्याचा प्रकार सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) उघडकीस आणला आहे. या कारवाईत संबंधित प्रवाशाकडून 705 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. (Pune Crime)

 

या प्रवाशाकडे केलेल्या तपासामध्ये तो दुबई ते अहमदाबाद (Ahmedabad) आणि त्याच विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे आला होता. प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. चिकटपट्टीने बिस्कीटे गुंडाळून त्याने ती बुटात ठेवून आणल्याचे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी प्रवाशाला अटक (Arrest) करण्यात आली असून हा प्रकार सोमवारी (दि.7) समोर आला आहे.

पुणे कस्टम विभागाकडून (Pune Customs Department) तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
डिसेंबर 2021 मध्ये केलेल्या कारवाईत चेन्नई (Chennai) ते मुंबई (Mumbai) असा प्रवास करणाऱ्या
एका प्रवाशाकडून 24 कॅरेटचे 40 लाख 36 हजार रुपयांचे 800 ग्रॅम सोने जप्त केले होते.
तर 8 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या कारवाईमध्ये पुणे विमानतळावरुन शारजाह (Sharjah)
येथे जाणाऱ्या एका प्रवाशाकडून 6 लाखांचे विदेशी चलन (Foreign Currency) जप्त केले होते.

 

Web Title :- Pune International Airport Lohegaon | smuggled gold worth 34 lacs seized at Pune International Airport Lohegaon by custom Department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hemant Rasne | सदाशिव-शनिवार आदर्श प्रभागासाठी प्रशासकीय जबाबदारी निश्चित; स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

 

Foods That Trigger Migraine | गोड पदार्थ आणि चॉकलेटने वाढते मायग्रेनची वेदना, ‘या’ 8 गोष्टींपासून रहा दूर, जाणून घ्या

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’