Pune : जागतिक महिला दिन : ‘आशा स्त्री शक्ती सन्मान सोहळा’ उपक्रम अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आज जागतिक महिला दिन पुणे शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ‘आशा स्त्री शक्ती सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टच्या वतीने दत्तवाडी पोलीस ठाण्यातील कर्तृत्ववान महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Pune: International Women's Day: 'Asha Stri Shakti Sanman Sohala' honors women under the initiative

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, करोना काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी तसेच पोलीस दक्षता समितीमध्ये कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

Pune: International Women's Day: 'Asha Stri Shakti Sanman Sohala' honors women under the initiative

यावेळी पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत पुरुषोत्तम डांगी तर प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष अंजली लोणकर यांनी केले. यावेळी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार, अर्जुन खानापुरे, मनोज पोटे, दाते, रोहित भोकरे, संस्थेचे शंतनू खिलारे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष गणेश ठाकर तर आभार प्रदर्शन चंदन डाबी यांनी केले.

Pune: International Women's Day: 'Asha Stri Shakti Sanman Sohala' honors women under the initiative

Pune: International Women's Day: 'Asha Stri Shakti Sanman Sohala' honors women under the initiative