Pune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक
file photo
Share
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाइन जाहिरात पाहून गुंतवणूक केल्यानंतर तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा, अशी जाहिरात दिली होती.
याप्रकरणी सुयोग चुडीवाल (वय ३४, रा. चिंचवड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा अशी जाहिरात वाचली होती. त्यानंतर त्यांनी डी मॅट अकाउंट उघडून त्यामध्ये ६ लाख रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित कंपनीने सुयोग यांना ४ लाख माघारी दिले. मात्र, उर्वरित २ लाख रुपये आणि १ लाखांचा परतावा अशी मिळून ३ लाखांची फसवणूक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक दत्तात्रयक काळे हे करीत आहेत.