Pune : पुण्यात हवालदाराच्या खूनाला 24 तासही झाले नाहीत; बिबवेवाडीत सराईताकडून पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळ करत वीट भिरकावून मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीत एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याचे प्रकरण होऊन 24 तासही झाले नसताना एका पोलीस कर्मचाऱ्याला सराईत गुन्हेगारांनी शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने विटा भिरकावून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई अमोल निवृत्ती नवले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हेगार अमोल तानाजी ढावरे (वय 20), सनी संतोष भरगुडे (वय 20) आणि त्यांच्या दोन साथीदारवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री पापळ वस्ती परिसरात गोंधळ घालत होते.

त्यामुळे फिर्यादी अमोल नवले यांनी तेथे जाऊन त्याना जाब विचारला. यावरून आरोपी सनी भरगुडे याने फिर्यादी यांच्या दिशेने वीट भिरकावून शिवीगाळ केली. तर अमोल ढावरे याने फिर्यादी यांच्याशी झटापट करून शिवीगाळ केली आणि ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहे.