Pune : हस्ताक्षरांवरून इतरांचं ‘व्यक्तीमत्व’ ओळखायला शिकणं अगदी सोपं, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनींचं मत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षर हे वेगवेगळे असते. जगातला कोणाताही व्यक्ती कोणाचेही हस्ताक्षर हुबेहूब काढून शकत नाही म्हणजेच कोणी ‘सेम-टू-सेम’ (100 %) कॉपी करू शकत नाही. मात्र, कोणताही व्यक्ती कोणाच्याही हस्ताक्षराची कॉपी करू शकतो परंतु ते 100 % ‘सेम-टू-सेम’ असूच शकत नाही. कारण, परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या लिखाणाला दाब (pressure) दिला आहे. बर्‍याचशा वेळेस जेव्हा आम्ही लोकांना बोलतो की तुमच्या स्वाक्षरी (सही), लिखाणावरून किमान तुमच्या स्वभावातील 20 ते 25 गुण, अवगुण कळतात. काही जणांच्या बाबतीत शरीरातल्या व्याधी पण कळतात. त्यावेळी कुतुहल निर्माण होतं की हे नक्की कस घडत. आज आपण ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात…

ज्यावेळेस आपल्याला काही लिहायचे असते ते लिहण्याच्यापुर्वी आपल्या मेंदूमध्ये काही विचार येतात. विचारांचे रूपांतर कृतीमध्ये होते (हस्ताक्षर) आणि कृतीचे रूपांतर त्या मनुष्याच्या गुणांमध्ये (स्वभावामध्ये) होते आणि वारंवार हीच क्रिया पुन्हा-पुन्हा होत असल्यामुळे त्या मनुष्याचा स्वभावच हस्ताक्षरासारखा होतो.

हस्ताक्षरांवरून काय – काय कळते ?
*
स्वत:ला समजायला मुदत मिळते (मैं एैसा क्यू हुँ ?)
* मुख्यत: आपल्या घरातील मुलांचे (1 ते 14 वर्षे) हस्ताक्षर पाहून पालकांना मुलांची घडवणूक करता येते.
* आपल्या सोबतचा व्यक्ती तसेच काम करणार्‍यांची गुन्हेगारी वृत्ती ओळखता येते.
* नोकरदार वर्ग निवडाताना त्यांच्यामधील क्षमता कळतात.
* व्यवसायाचा भाीगीदार असेल किंवा जीवनाचा जोडीदार असेल त्यांच्या स्वभावातले लपलेले गुण-अवगुण कळतात आणि बरच काही…

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (8605112233)