Pune : मॅट्रिमोनी साईटवर जाफर सादीकची झाली 32 वर्षीय महिलेशी ओळख, त्यानं घातला पावणे 2 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मेट्रीमोनीसाईटवरून महिलेशी ओळख करत एकाने त्यांना पावणे दोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाफर सादीक अब्दुल रहेमान सय्यद (वय ३३, रा. बंगळुरू) याच्यावर आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विवाहसाठी मेट्रीमोनीसाईटवर नावनोंदणी केली होती. त्यानंतर त्यांची आरोपीसोबत मेट्रोमोनीसाईटवरून ओळख झाली. त्यावेळी आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्यासोबत ओळख वाढविली.

त्यांच्यात संवाद वाढल्यानंतर आरोपीने महिलेकडून विविध कारणांसाठी एक लाख ८५ हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपी हा महिलेला टाळू लागला. त्यानंतर आरोपीने संपर्क ही तोडला. महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास वारजे पोलिस करत आहेत.

You might also like