येरवाड्यातील ‘या’ इमारत तात्पुरत्या स्वरूपात नवीन ‘कारागृह’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आता येरवड्यातील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाची इमारत तात्पुरत्या स्वरूपात नवीन “कारागृह” असणार असून, नवीन बंदीवानाना याठिकाणी ठेवण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील किरकोळ आणि 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व कारागृहातून बंदीना सोडले जात आहे. तर राज्यातील काही मोठे कारागृह लॉकडाऊन केले आहेत. तरीही कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक बंदी आहेत.

दरम्यान पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदीवानांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, तरीही कारागृहात गंभीर गुन्ह्यातील बंदिवान्याची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारागृहात नवीन बंदिवान दाखल केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंदिवानासाठी येरवड्यातील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह तात्पुरते कारागृह घोषित करण्यासाठी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. त्यानुसार मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह तात्पुरत्या स्वरूपात कारागृहासाठी वापरण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांमुळे इतरांना कोरोनाच्या विषाणूची लागण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. संबंधित नव्याने दाखल होणाऱ्या बंदीवानांना तात्पुरते क्वॉरंटाईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलींचे वसतीगृहाच्या इमारतीत सोय करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीत नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांना क्वॉरंटाईन करन्यासाठी काळजी घेतली जात आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी तात्पुरते कारागृहाच्या ठिकाणी सुरक्षेकरीता २४ तास पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तात्पुरत्या कारागृहात दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी आणि एक लिपीकाची नियुक्ती करण्याची सूचना जिल्हाधिकारी राम यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकाना केली आहे. त्यानुसार याचे काम सुरू करण्यात आले आहे.