Pune Jain Community | झारखंड सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा जैन समाजाकडून पुण्यात रॅली काढून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Jain Community | जैन धर्मीयांचे सिद्धक्षेत्र महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी (Shri Sammed Shikharji) हे झारखंड सरकारने (Jharkhand Government) पर्यटन क्षेत्र घोषीत केले. झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरातील सकल जैन समाजाने (Pune Jain Community) सोमवारी (दि.26) दुचाकी रॅली (Bike Rally) काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदेन देण्यात आले.

 

झारखंड सरकारचा निषेध (Protest) करण्यासाठी सकल जैन समाजाने एच.एन.डी.जैन बोर्डिंग (HND Jain Boarding), मॉडेल कॉलनी (Model Colony) पासून दिप बंगला चौक, ललित महल चौक, पोलीस लाईन, कोर्ट रोड, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, बंडगार्डन चौक या मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्य़ालयापर्यंत रॅली काढली. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीमध्ये विलास राठोड, मिलींद फडे, चकोर गांधी, डॉ. कल्याण गंगवाल, अभय छाजेड, प्रवीण चोरबोले,
सुरेंद्र गांधी, अॅड. शितल लोहाडे, मनिष बडजाते, महावीर शहा, रवी जैन, चंद्रकांत लोढा, जितू तातेड,
बाळासाहेब धोका, प्रकाश बडजाते, बाबा (खराडी), पंकज पाटणी, सिद्धार्थ शहा, आदित्य शहा, सुजाता शहा,
मिनल म्हेत्रे, क्षमा अजमेरा, सुरेखा गांधी, दामिनी शहा, एच.एन.डी. बोर्डिंगमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

Web Title :- Pune Jain Community | The Jharkhand government’s ‘that’ decision was protested by the Jain community by holding a rally in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स