Pune : नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणार्‍याला गुजरातच्या जेलमधून घेतलं ताब्यात, सायबर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक(Fraud) केल्याप्रकरणी एकाला सायबर पोलिसांनी गुजरातच्या कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनुप पंढरीनाथ ढोरमले (वय 30, रा. जातेगाव, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार विशाल मीनानाथ जमदाडे ( वय 24, रा. पारनेर, जि नगर ) याला गेल्या महिन्यात अटक केली होती.

Pune : सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढणार्‍या 33 जणांना पोलिस कोठडी, सुरूवातीला फेटाळली होती पोलिसांची मागणी पण सत्र न्यायालयानं दिली कस्टडी, जाणून घ्या कोर्टात काय झालं

ढोरमले व त्याच्या साथीदारांने नोकरीविषयक केंद्र सुरू केले होते. तर एक वेबसाईट देखील तयार केली होती. त्यात विविध देशांत नोकरी लावण्याची माहिती टाकली होती. या माध्यमातून परदेशात नोकरीसाठी जाण्यास उत्सुक असलेल्याची माहिती गोळा करत असे. त्याच्या लमाझमा पाहून अनेकांनी येथे नोंदणी केली. त्यानंतर त्याने ऑनलाईन मुलाखत, व्हिसा, चाचण्या यासह वेगवेगळ्या बहाण्याने पैसे उकळत असे. पैसे घेतल्यानंतर मात्र त्यांच्याशी संपर्क करत नसे. गेल्या वर्षापासून हा प्रकार सुरू होता. याबाबत दोघांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास काढून पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित व त्यांच्या पथक करत होते.

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तसांत ‘कोरोना’चे 458 नवीन रुग्ण, 314 जणांना डिस्चार्ज

त्यानुसार जमदाडे याला पारनेर (जि.. नगर)मध्ये पकडले होते. पण, मुख्य सूत्रधार ढोरमले असल्याचे त्याने सांगितले. तर या गुन्ह्यांची इंतभूत माहितीही त्याने दिली. अश्याच एका फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन महिन्यापूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केल्याचे समजले. मग, याची माहिती घेण्यात आली. त्यात तो पोलीस कोठडी संपल्याने तो वडोदरा कारागृहात असल्याची समजले. त्यानुसार न्यायालयातून वॉरंट घेऊन पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात अटक केली आहे.

Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खा. संभाजीराजेंना सांगितला ‘हा’ कायदेशीर मार्ग

Corona Vaccination : उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस मिळणार – आदित्य ठाकरे