Pune : लष्कराची बनावट वेबसाईट तयार करून नोकरीचे आमिष ! बनावट नियुक्तीपत्राव्दारे लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कराची बनावट वेबसाईट तयारकरून त्याद्वारे तरुणांना लष्करात नोकरी Job देण्याचे आमिष देऊन आणि त्यांना नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र देत लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. आतापर्यंत 11 तक्रारी आल्या आहेत. त्याची व्यप्ती वाढण्याची शक्यता आहे.

याप्रकरणात भारत कृष्णा काटे (वय 41) याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर तीन साथीदारांच्या शोध सुरू आहे. याबाबत सलमान गौसउद्दीन शेख (वय 21, करडखेर गाव, लव्हारा, उदगीर, लातूर) त्या तरुणाने तक्रार दिली आहे.

भारत काटे हा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्याची भारतीय सैन्य दलात भरती पूर्व प्रशिक्षण संदर्भात अकॅडमी आहे. सैन्य दलात भरती होण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे येणाऱ्या तरुणांना तो विश्वासात घेऊन सैन्य दलात नोकरी Job लावण्याचे आमिष दाखवत होता. या बदल्यात त्यांच्याकडे सहा ते सात लाख रुपयांची मागणी करत होता. यातील काही पैसे मिळाल्यानंतर तो त्यांना दिल्ली, झांसी, रांची, लखनऊ, जबलपूर या शहरात बनावट मेडिकल चाचणीसाठी पाठवायचा. आणि त्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्र द्यायचा.

दरम्यान सदर्न कमांडच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य दलाची बनावट वेबसाइट करून फसवणूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत माहिती दिली.
त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळेयांना याची माहिती देऊन आणखी सखोल माहिती घेत खातरजमा केली.
त्यानंतर हा प्रकार खरा असल्याचे समोर येताच काटे याला पकडले आहे.
आता त्याच्या साथीदार आणि इतरांचा शोध घेतला जात आहे.
या टोळीने आतापर्यंत फिर्यादी आणि त्याच्या दोन मित्रांना अश्या तिघांकडून 13 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
यानंतर आता आणखी 9 तरुणांनी अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे सांगत पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.
त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
त्यासाठी पुणे पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपसासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे