घासून नाय तर ठासून आलोय ! पुण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘भाऊ’ बायडेन अन् ‘आक्का’ हॅरीस यांच्या अभिनंदनाच्या कमानीची ‘गावभर’ चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकेच्या सत्ताकारणात आजपासून बायडन पर्व सुरु होण्यासोबत नवीन इतिहासही रचला जाणार आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस शपथ घेणार आहेत. तर जो बायडन हे 46 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत.

कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या असून त्यांची 49 व्या उपराष्ट्रपदी पदी नियुक्ती झाली आहे. कमला हॅरीस यांचे अभिनंदर करण्यासाठी धनकवडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाजवळी पादचारी पुलावर त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. या फ्लेक्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल होत आहे. सध्या शहरामध्ये हे फ्लेक्स चर्चेचा विषय बनले आहेत.

kamal-harris

 

 

 

kamala-harris