Pune Journalist In Police Custody | खंडणी प्रकरणी पत्रकार शिरसाठला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Journalist In Police Custody | हडपसर येथील व्यावसायिकाकडे 5 लाख रुपयांची खंडणी (ransom) मागून ती न दिल्यास तुम्हाला जड जाईल, अशी धमकी देणार्‍या पत्रकार (Pune Journalist In Police Custody ) अर्जुन लक्ष्मण शिरसाठ (वय 41, रा. आंबिल ओढा वसाहत, दांडेकर पुल) (Journalist Arjun Laxman Shirsath) याला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक (Arrest) केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे.

आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर असून आरोपीने पत्रकार असल्याची बतावणी करुन गुन्हा केला आहे. आरोपी कोणत्या वृत्तपत्रात अगर चॅनलचा वार्ताहर आहे यासंदर्भात अधिक तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपीकडून पत्रकारितेचे प्रमाणपत्र, ओळखपत्र हस्त करायचे असून अशा प्रकारचे गुन्हे पुणे शहरात सतत घडत आहेत. त्यामुळे आरोपीची टोळी आहे का याचा तपास करायचा असल्याने आरोपीला 7 दिवसांच्या पोलीस कोठीची मागणी पोलिसांनी केली होती. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी (Pune Journalist In Police Custody) मंजूर केली.

काय आहे प्रकरण ?
याप्रकरणी हडपसर परिसरातील हिंगणेआळी येथे राहणार्‍या एका 32 वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अर्जुन शिरसाठ याने या व्यावसायिकाला फोन करुन खंडणी मागितली. त्या फोन कॉलवरुन त्याने या व्यावसायिकाकडून यापूर्वीही 5 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हडपसर येथील माळवाडी रोडवरील कुमार पिका सोसायटी येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. अर्जुन शिरसाठ हा पूर्वी पुण्यातील एका मोठ्या वृत्तपत्रात काम करीत होता. सध्या तो कोणत्याही वृत्तपत्रात काम करीत नाही.

फिर्यादीचे गांधी चौकात दुकान आहे. त्यांच्या दुकानातील सिगारेट, बडीशेप, बिडी, गोळ्या असा माल चालक टेम्पोतून घेऊन जात होता. पत्रकार म्हणविणार्‍या शिरसाट याने टेम्पो अडविला.
टेम्पोची चावी काढून घेतली. हे त्यांच्या टेम्पो चालकाने फिर्यादींना सांगितले.
शिरसाट याने फिर्यादी यांना फोन करुन ‘‘तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये सिगारेट, बिडी विकत असता,
तुम्ही मला 5 लाख रुपये द्या. तुम्ही 5 लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला जड जाईल,
तुमच्यावर केस करावी लागेल. तुम्हाला 5 लाख रुपये द्यावेच लागेल, ’’अशी मागणी केली व फोन ठेवून दिला.

त्यानंतर टेम्पोचालकाने चावी मागितल्यावर शिरसाट याने त्याला खलास करण्याची धमकी देऊन डोक्यात काचेची बाटली मारुन जखमी केले.
टेम्पोची पुढील काच फोडली. हे समजल्यावर त्यांनी चालकाला हडपसर पोलीस ठाण्यात बोलावले.
तेथून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्रकार शिरसाठ याचे फिर्यादी यांच्याबरोबर फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे.
त्यात फिर्यादी यांच्यावर गुटखा विक्री केल्याप्रकरणी केस झाली होती.
तेव्हा तुम्ही 5 लाख रुपये दिले होते. आताही द्या अशी मागणी शिरसाट याने केल्याचे दिसून येते.
त्यावर फिर्यादी याने आता हे काम आम्ही सोडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला आता कशाचे पैसे द्यायचे,
असे विचारताना दिसत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (api padsalkar) अधिक तपास करीत आहेत.

Web Titel :- Pune Journalist In Police Custody | pune court send journalist arjun shirsath in police custody for three days in extortion case of five lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलतेंना बळजबरीने दिली 50000 ची ‘लाच’, दौंडमधील दत्तात्रय पिंगळे आणि मांजरीतील अमित कांदेला ACB कडून अटक

MP Girish Bapat | PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खा. बापट यांचा अनोखा उपक्रम

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीचा धमाका ! 233 रुपये खर्च करून मिळतील 17 लाख रुपये, जाणून घ्या