खराडीमध्ये कैलास पठारे यांचा मजुरांना जेवण देण्याचा स्तुत्य उपक्रम

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मागिल दीड महिन्यापासून देशभर लॉकडाऊन आहे. पुणे शहर आणि उपनगरातील उद्योग, व्यवसाय, कंपन्या, हॉटेल्स, बांधकाम व्यवसाय आदी सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या परिसरात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी खराडीतील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना विभागप्रमुख कैलास पठारे यांनी तयार भोजन देण्याचा उपक्रम लॉकडाऊनपासून सुरू आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेना शिवअंगणवाडीच्या संघटिका अमृत पठारे यांनी सांगितले.

अमृत पठारे म्हणाल्या की, चंदननगर खराडी येथील संजरी फाउंडेशनच्या वतीने बेरोजगार झालेल्या मजुरांना मागिल दहा दिवसांपासून दररोज ताजे आणि सकस अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे. अ‍ॅन्टी टास्क फोर्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा भारती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गोळे, अ‍ॅन्टी टास्क फोर्स च्या प्रतिनिधी अमृत पठारे,मनोहर मिसाळ यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. संजरी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते कैलास पठारे यांनी अन्नछत्र सुरू केले आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव असफ शेख, काशीनाथ मानेमोड, तुळसाबाई पगारे, कु. निकिता कांबळे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे, असे संजरी फाउंडेशनचे समन्वयक ईसा शेख यांनी सांगितले.