Pune Kalyani Nagar News | पुणे: कल्याणीनगरमध्ये पहाटेपर्यंत ‘पब’च्या जवळ युवक-युवतींचा ‘राबता’; व्हायरल व्हिडीओमध्ये तरूण-तरूणींसह अनेक दुचाकी-चारचाकी अन् पोलिस व्हॅन देखील स्पॉट, पोलिस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

पुणे : Pune Kalyani Nagar News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी शहरात 144 कलम लागू केले असले तरी कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटेपर्यंत ‘पब’च्या जवळील (Elrow Pub In Kalyani Nagar Pune) रस्त्यावर अनेक युवक-युवतींची वर्दळ दिसून आली. तसेच परिसरात अनेक दुचाकी-चारचाकी वाहनांसह पोलिस व्हॅन (Police Van) देखील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. रस्त्यांवर तरुण-तरुणी घोळक्याने येताना-जाताना दिसत आहेत. याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे पोलिसांनी कुरकुंभ MIDC परिसरातील एम डी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला (Pune Drugs Case). तेथून देशातील विविध शहरात पुरवठा केलेले ड्रग्सही जप्त केले. सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले. या ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर वापर पार्ट्या, पबमध्ये केला जात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पार्ट्या, हॉटेल, रेस्टॉरंट, पब यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. हॉटेल, पब हे रात्री दीड वाजल्यानंतर चालू असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.

पुण्यात काही ठराविक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पब्ज आहेत. तेथे नेहमीच पहाटेपर्यंत धिंगाणा सुरु असतो असा आरोप स्थानिक रहिवाशांकडून वेळावेळी करण्यात येतो. पोलीस आयुक्तांच्या इशार्‍यानंतरही त्यामध्ये काही एक फरक पडला नसल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. तो व्हिडीओ कल्याणीनगरमधील पबच्या शेजारी असलेल्या रस्त्यावरील वर्दळीचा आहे. दीड वाजता पब्ज बंद करण्याचा आदेश दिला असला तरी पहाटे 3 वाजेपर्यंत येथील पब्जच्या शेजारील रस्त्यावर मोठया प्रमाणात युवक-युवतींची वर्दळ होती. रस्त्यावर सर्वत्र गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. असंख्य तरुण तरुणी घोळक्याने उभे होते. कॅब, रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात थांबलेले दिसत होते.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस व्हॅन देखील स्पॉट झाली आहे. 144 कलम लागू असताना देखील परिसरात वर्दळ दिसून आल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) का कारवाई केली नाही असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे.

This crowd is gathering at 3am late night Dmart lane Kalyani Nagar creating nuisance. Crpc 144 is implemented these people should not gather.. we raised complaint with Yerwada police.

In the video police vehicle can be spotted and no action was taken. What’s the use of police patrol vehicle if they dont disperse the crowd?

Date : 3 rd March | Time :3 AM | Location : Dmart lane kalyani nagar.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कात्रज डेअरी लगतच्या जागेवरील क्रिडांगणाचे आरक्षण हटविण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपुर्वी होणार!

पुणे : पतीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण, चार महिलांवर FIR