Pune : कसबा पेठेत एका घरात सिलेंडरचा स्फोट, जेष्ठ दाम्पत्य जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कसबा पेठे(kasaba peth )त एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन जेष्ठ दाम्पत्य भाजल्याची घटना आज सकाळी घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली. तसेच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

ठाकरशी त्रिभवन सोळंखी (वय 90), वसंतबाई सोळंखी (वय 85) अशी जखमी झालेल्या जेष्ठ नागरिकांची नावे आहेत. सोळंखी दाम्पत्य साततोटी पोलीस चौकीच्या जवळ एका इमारतीत राहतात. पार्किंगमध्ये त्यांची 10 बाय 8ची खोली आहे. रात्री सिलेंडर लिकेज झाला. सकाळी त्यांनी पाणी तापवण्यासाठी गॅस सुरू केला. पण त्याचा भडका उडाला आणि गॅसचा स्फोट झाला.

यात दोघेही गंभीर जखमी झाले. भडका इतका मोठा होता की घरातील काचा फुटल्या तर भांडे देखील उडाले होते. नागरिकांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. यावेळी कसबा अग्निशमन केंद्राचे अधिकारी सुनील नाईकनवरे, कुंभार, दळवी, गायकवाड, वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जेष्ठ नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.