Pune Kasba And Chinchwad Bypoll Elctions | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि आश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba And Chinchwad Bypoll Elctions | दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुका (Kasba And Chinchwad Bypolls) जाहीर झाल्या असून त्यासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. (Pune Kasba And Chinchwad Bypoll Elctions)

अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जावून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. विशाल रॅलीचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजप पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), सुनिल कांबळे (Sunil Kamble), सिध्दार्थ शिरोळे (Siddharth Shirole), शैलेश टिळक (Shailesh Tilak), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नाना भानगिरे (Nana Bhangire), प्रदेश सचिव किरण साळी (Kiran Sali), संपर्क प्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale), रिपब्लिकन पक्षाचे डॉ.सिध्दार्थ धेंडे (Dr. Siddharth Dhende), शैलेंद्र चव्हाण (Shailendra Chavan), मंदार जोशी (Mandar Joshi), शिवसंग्रामचे भारत लगड (Bharat Lagad) यांच्यासह भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दोन्ही मतदारसंघातील निवडणुक बिनविरोध व्हावी यावर विचारण्यात आले असता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मी अजूनही विनंती करतो, त्यांना (महाविकास आघाडीच्या नेत्यांना) मी भेटायला तयार आहे. (Pune Kasba And Chinchwad Bypoll Elctions)

चिंचवड पोटनिवडणूक त्यांनी बिनविरोध करावी. असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेऊन
निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
त्यांच्या आवाहनामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील निवडणूक बिनविरोध
करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली होती.
शरद पवार यांना विनंती आहे की, जसे अंधेरीच्या निवडणुकीत पुढाकार घेतला, तसाच पुढाकार घेऊन
चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करावी. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी
विनंती महाविकास आघाडीला आहे.’ असे यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Web Title :-  Pune Kasba And Chinchwad Bypoll Elctions | bjp candidates hemant rasane ashwini jagtap filed their candidature for pune kasba peth chinchwad assembly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…