Pune Kasba Bypoll Election | एवढीच ताकद होती तर टिळक, घाटे, बापट यांना निवडून आणण्यात काय अडचण होती ?

प्रचारासाठीच्या ‘शक्तिमान’ रणनीतीवरून भाजपच्या बालेकिल्ल्यातील मतदारांनी व्यक्त केली नाराजी

पुणे :  भाजपने (BJP) कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pune Kasba Bypoll Election) संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मतदार संघाच्या निवडणूकिची कमान ज्येष्ठ आमदार आणि माजी महापौरांच्या हाती देतानाच मतदार संघातील 6 प्रभागांमधील प्रचाराचे नियोजन 6 आजी- माजी आमदारांच्या हाती दिले असून 100 माजी नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला दिली आहे. यावरून पक्षाने कसब्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे. परंतु या नियोजनाची उलट चर्चा सुरू झाली असून एवढीच ताकद लावायची होती तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पति शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि माजी सभागृह नेते धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांच्यासाठी बालेकिल्ल्यातील ‘विजय’ का अवघड होता ? असा प्रश्न भाजपच्याच मतदारांना पडला आहे. (Pune Kasba Bypoll Election)

कसबा पोटनिवडणुकीत भाजप महायुतीने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane ) यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर रासने यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदार संघात पोटनिवडणुकीत टिळक यांचे पति शैलेश टिळक हे इच्छुक होते. त्यासोबतच माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर (Ganesh Bidkar), हेमंत रासने आणि खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या स्नुषा स्वरदा बापट इच्छुक होत्या.

भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निवडणूक बिनविरोध न झाल्यास शैलेश टिळक, स्वरदा बापट, गणेश बिडकर यांच्यासाठी निवडणूक कठीण जाऊ शकते असा निष्कर्ष निघाला. त्यामुळेच हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष असे की गेली 6 ते 7 निवडणुकीत भाजपने या मतदार संघात विजय मिळवला असून भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. (Pune Kasba Bypoll Election)

मागील सहाही निवडणुकीत गिरीश बापट आणि मुक्ता टिळक हे ब्राम्हण समाजातील उमेदवार निवडून आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अलिकडच्या काळात पुण्यातील कोथरूड आणि कसबा मतदार संघात ब्राम्हण समाजाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने आतापर्यंत कसबा मतदार संघात भाजपने ब्राम्हण उमेदवारालाच संधी दिली आहे. यामध्ये अगदी अरविंद लेले, अण्णा जोशी, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांचा यामध्ये उल्लेख करता येईल. तर काँग्रेस (Congress) नेही कसब्यात राहणारे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, अनंत गाडगीळ, रोहित टिळक यांना संधी दिली आहे.

यंदाची निवडणूक ही पोटनिवडणूक आहे. राज्यात 7 महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे
गटाची सत्ता आली आहे. त्यामुळे एका जागेवरून सत्तेची गणित ठरणार नव्हती की मुख्यमंत्री पद ठरणार नव्हते,
मग शैलेश टिळक, धीरज घाटे अथवा स्वरदा बापट यांना निवडून आणण्यात पक्षाला काय अडचण होती ?
असा प्रश्न भाजपचा कट्टर मतदार प्रामुख्याने ब्राम्हण मतदार उपस्थित करू लागला आहे.

पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि पालकमंत्री व
कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर
केल्यानंतर विरोधकांना केलेले आवाहनही पटलेले नाही. विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करावी आम्ही
हेमंत रासने यांची उमेदवारी बदलतो असे आवाहन विरोधकांना करून एकप्रकारे बालेकिल्ल्यात भरघोस
मतदान करणाऱ्या मतदारांवरही अविश्वास दाखवला आहे, याची कुजबुज आता कार्यकर्ते आणि हक्काचे मतदारही
करू लागले आहेत. पक्ष नेतृत्वाने लढण्याआधीच देशातील 9 वर्षाच्या सत्तेनंतर पक्षाच्या ताकदीवर
प्रश्नचिन्ह निर्माण करून विरोधकांना बळ दिल्याची जोरदार चर्चा पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Web Title :-  Pune Kasba Bypoll Election | What was the problem in electing Tilak, Ghate, Bapat if there was only such strength?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashtriya Lingayat Mahaadhiveshan | बसवकल्याणमध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन

Pune Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर