Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Bypoll Elections | कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Elections) भाजपकडून आमदार स्व. मुक्ता टिळक (Late Mukta Tilak) यांचे पति शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. स्व. मुक्ता टिळक यांच्या पक्षाप्रति असलेल्या निष्ठेमुळेच शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी (BJP Leader) अनुकुल असून शैलेश टिळक यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक देखिल बिनविरोध करण्यासाठी भाजपमधून जोरदार हालचाली सुरू आहेत. (Pune Kasba Bypoll Elections)
कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Late Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघात (Chinchwad Bypoll Elections) २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी टिळक आणि जगताप यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या संयुक्त बैठकादेखिल सुरू आहेत. अशातच नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्ष्मण जगताप यांच्या घरी भेट दिल्यानंतर जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिल्यास तेथे प्रबळ विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माघारीची शक्यता अधिक असल्याची जोरदार चर्चा आहे. (Pune Kasba Bypoll Elections)
याच पार्श्वभूमीवर कसबा मतदार संघात देखिल मुक्ता टिळक यांचे पति शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर आले आहे. या मतदार संघातून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्याही नावाची चर्चा आहे. परंतू यातूनही शैलेश टिळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता असल्याचा भाजपच्या स्थानीक नेतृत्वाचा अंदाज आहे. दरम्यान कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या उमेदवारीची देखिल चर्चा आहे.
फडणवीस टिळक कुटुंबियांना न्याय देणार !
मागीलवर्षी झालेल्या राज्य सभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये व्हेटींलेटरवर असलेल्या मुक्ता टिळक यांनी ऍम्ब्युलन्सने मुंबईला मंत्रालयात जाउन मतदान केले होते.
भाजपचे अतिरिक्त उमेदवार विजयी होण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य असताना टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती गंभीर असतानाही पक्षनिष्ठेसाठी अमुल्य योगदान दिले.
दुर्देवाने अवघ्या काही महिन्यांतच या दोन्ही आमदारांचे काही दिवसांच्या अंतराने निधन झाले.
टिळक आणि जगताप यांच्या निधनानंतर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिळक आणि जगताप यांच्या पक्षनिष्ठेबद्दल वेळोवेळी गौरोद्गार काढले आहेत.
तेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील टिळक कुटुंबियांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देउन शब्द पाळणार ? याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Web Title :- Pune Kasba Bypoll Elections | Shailesh Tilak’s name is in front from Kasby by BJP
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश
Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)