Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेऊन चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुक (Pune Kasba-Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करावी, अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शरद पवार यांना केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी. यासाठी जसा पुढाकार घेतला होता तसाच याही वेळी घ्यावा. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधत होते. (Pune Kasba-Chinchwad Bypoll Election)

 

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), शंकर जगताप (Shankar Jagtap), आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) आदी भाजपचे नेते यावेळी उपस्थित होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी डमी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चांना उधान आले होते. मात्र, बावनकुळे यांनी आश्विनी जगताप याच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार असून डमी अर्ज सादर करावा लागतो. असा निर्वाळा यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

 

आश्विनी जगताप यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, ‘अश्विनी जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. अश्विनी जगताप यांच्यासाठी मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर आली आणि पदयात्रेत सहभागी झाली. चिंचवडच्या जनतेला विनंती करतो की, प्रचंड मतांनी अश्विनी जगताप यांना विजयी करावे.’ असे यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Pune Kasba-Chinchwad Bypoll Election)

तर कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आल्याचेही यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले.
तर, मी अजूनही विनंती करतो, त्यांना मी भेटायला तयार आहे. चिंचवड पोटनिवडणूक त्यांनी बिनविरोध करावी.
असे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की,
अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
त्यांच्या आवाहनामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते.
त्यानंतर अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली होती. शरद पवार यांना विनंती आहे की, जसे अंधेरीच्या निवडणुकीत पुढाकार घेतला,
तसाच पुढाकार घेऊन चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करावी.
चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती महाविकास आघाडीला आहे.
असे यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | sharad pawar should take initiative and conduct chinchwad and kasba by elections unopposed appeals chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tagenarine Chanderpaul’s century | तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने रचला इतिहास; पिता- पुत्रांनी ‘या’ यादीमध्ये मिळवले स्थान

Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश