Pune Kasba Chinchwad Bypoll Elections | कसबामधून हेमंत रासने यांना तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहिर, उमेदवारांची घोषणा दिल्लीतून

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Chinchwad Bypoll Elections | कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची (Pune Kasba Chinchwad Bypoll Elections) तारीख जाहीर झाली आहे. या निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या (BJP Candidates) नावाची घोषणा दिल्ली येथून करण्यात आली. चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसबा मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज सहा तारखेला दाखल केले जाणार असल्याची माहिती भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency) भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे (Chinchwad Vidhan Sabha Constituency) आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक (Pune Kasba Chinchwad Bypoll Elections) होत आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने चिंचवड आणि कसबा येथील इच्छुक उमेदवारांच्या नावाची यादी केंद्रीय समितीकडे पाठवली होती. त्यानंतर शनिवारी (दि.3) उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला.
यानुसार 5 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी
(Voter List) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 205- चिंचवड विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 723 स्त्री आणि 35 तृतीयपंथी याप्रमाणे एकूण 5 लाख 66 हजार 415 मतदार संख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 48 हजार 106 ची वाढ झाली आहे.

215- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 36 हजार 873 पुरुष, 1 लाख 38 हजार 550 स्त्री आणि
5 तृतीयपंथी याप्रमाणे 2 लाख 75 हजार 248 याप्रमाणे मतदार संख्या आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 15 हजार 255 ची घट झाली आहे.

Web Title :- Pune Kasba Chinchwad Bypoll Elections | Hemant Rasane from Kasba and Ashwini Jagtap, wife of Laxman Jagtap from Chinchwad, announced by BJP, candidates announced from Delhi.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime News | नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडिओ)

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड