Pune Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखांमध्ये बदल; आता या तारखेला होणार मतदान

पुणे : Pune Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी यापूर्वी २७ फेबुवारी मतदान होणार होते. मात्र, आता निवडणुक आयोगाने ही तारीख बदलली आहे. आता कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. (Pune Kasba-Chinchwad Bypolls)

महाराष्ट्रात या काळात १२ वीची परीक्षा तसेच अनेक महाविद्यालयात पदवी परीक्षा होत आहे.
त्यामुळे परीक्षाच्या काळात मतदानासाठी या शाळा व महाविद्यालये मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याचे पुणे जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाला कळविले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मतदानाच्या तारीखेत बदल करण्यात आला असून आता सोमवार ऐवजी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

Web Title :- Pune Kasba-Chinchwad Bypolls | Change in polling dates for Kasba and Chinchwad by-elections; Now the voting will be held on this date