Pune Kasba Peth Bypoll Election | 40 गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह चोरले, शिवसेनेचे नाव चोरले परंतु…, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | ही निवडणूक संविधान व लोकशाही वाजवणारी ठरणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल तुमच्या विराट प्रतिसादामुळे आताच लागला असल्याची भावना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज येथे केली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील (Pune Kasba Peth Bypoll Election) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ नाना पेठ येथील साखळीपीर तालीम चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील (NCP MP Srinivas Patil), विधानपरिषदेतीलच विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve), शिवसेना नेते सचिन आहेर, चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, उल्हासदादा पवार, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, बाळासाहेब दाभेकर, रवींद्र माळवादकर, अरविंद शिंदे, संजय मोरे, विशाल धनवडे, रुपाली ठोंबरे, संग्राम थोपटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या सभेत आदित्य ठाकरे म्हणाले, या सभेला मिळालेला तुमचा इतका प्रचंड प्रतिसाद पाहून ही विजयाचीच सभा असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसाचे राजकारण पाहता ४० गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह चोरले, शिवसेनेचे नाव चोरले परंतु अशा कठीण परिस्थितीत महाविकास आघाडीचे कवच धंगेकर यांना लाभले असून, ते निवडून आले आहेत हे सांगण्याची आता गरज नाही. याच कसब्यातून आदिलशाही व ब्रिटिशांविरुद्ध बंडाची सुरुवात झाली.
महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी गद्दारांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. देशाची दिशा ठरविणारी ही निवडणूक असून या देशात अजूनतरी ‘सत्यमेव जयते’ला महत्त्व आहे. महाराष्ट्राला मागे ओढत येथील भूमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या गुजरातला नेणारे हे असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेले सरकार घालविण्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी व या महाराष्ट्राची प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावण्यासाठी व पुन्हा वैभवाचे दिवस आणण्यासाठी आपण सज्ज होऊ या.
कसबा मतदार संघातील (Pune Kasba Peth Bypoll Election) जनता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर
यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल हा विश्वास त्यांनी शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केला.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांची ध्वनिचित्रफित मार्फे मतदारांशी संवाद साधून रवींद्र धंगेकर यांना विजयी कार्याचे आवाहन करून
ही निवडणूक सहानुभूतीची नसून टिळकांच्या घराण्यावर अन्याय करत व गंभीर आजारी असणाऱ्या गिरीश बापट (Girish Bapat)
यांना ऑक्सिजन सिलेंडर च्या नळ्या लावलेल्या अवस्थेत प्रचारात उतरवून भाजपने आपल्या क्रूरतेचे दर्शन
पुणेकरांना दाखवून दिले आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
प्रारंभी पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अनेक संघटना व संस्थांनी आदित्य ठाकरे यांचा स्वागत व सत्कार केला.
सभेच्या प्रारंभीच्या भागात आदित्य ठाकरे यांनी समोरच्या जनसमुदायाला उद्देशून ’50 खोके’
असा नारा देताच साऱ्या जनसमुदायातून ‘एकदम ओके’ असा जोरदार प्रतिसाद मिळत राहिला.
यामध्ये तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती.
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | 40 traitors stole the symbol of Shiv Sena, stole the name of Shiv Sena but…, Aditya Thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Kasba Peth Bypoll Election | धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार – मोहन जोशी