Pune Kasba Peth Bypoll Election | मेधा कुलकर्णी, मुक्ता टिळक यांच्यापाठोपाठ गिरीश बापट यांचा मतदार संघ देखिल गेला? पुण्यातील ब्राम्हण समाजातील नाराजी बॅनर बाजीतून समोर आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली

पुणे : Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपने कसबा (Kasba BJP) मतदार संघातून आमदार स्व. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांना उमेदवारी नाकारल्याने ब्राम्हण समाजात (Brahman Samaj) मोठी नाराजी पसरली आहे. अगोदर मेधा कुलकर्णी, नंतर स्व. मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) आणि आता गिरीष बापट (Girish Bapat) यांचा मतदार संघ जाणार ? असे फलक शहरात झळकू लागल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. मुक्ता टिळक यांचे पति येथुन निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांचा पत्ता कट करत हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली. यामुळे टिळक कुटुंबियांसोबतच ब्राम्हण समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्वतः शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच ब्राम्हण समाजातील युवकांनी स्थापन केलेल्या हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) देखिल नाराजी व्यक्त केली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

दरम्यान यापूर्वी कोथरूड मतदार संघाच्या (Kothrud Vidhansabha) तत्कालीन आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni) यांचा पत्ता कट करून पक्षाचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली. तर कसब्यात आमदाराच्या निधनामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांच्या कुटुंबीयांचा विचार न करता रासने यांना उमेदवारी देण्यात आली. हा टिळक कुटुंबियांसोबत ब्राम्हण समाजावर अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे.

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सलग 6 वेळा येथून भाजपने येथे विजय मिळविला आहे. या मतदार संघातून गिरीश बापट हे पाच वेळा आमदार झाले, त्यांना मंत्रिपद देखिल मिळाले आहे. तर मागील निवडणुकीत मुक्ता टिळक यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. महापालिकेत देखील तीन जागा वगळता सर्वच जागा भाजप कडे आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. असे असताना भाजपला टिळक कुटुंबातील व्यक्तीला सहज निवडून आणणे शक्य होते.

परंतु यानंतर ही भाजपने केवळ राजकारणालाच प्राधान्य देऊन टिळक कुटुंबियांवर अविश्वास दाखवला आहे.
कसबाच नव्हे तर कोथरूड, खडकवासला आणि पर्वती मतदार संघात ब्राम्हण समाजाची निर्णायक मते आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ब्राम्हण समाजाची मते ही पुण्यात आहेत. त्यामुळेच मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पति शैलेश टिळक, धीरज घाटे, खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट (Swarada Kelkar Bapat) हे इच्छुक असताना त्यांना नाकारून भाजपने ब्राम्हण समाजाचा उपमर्द केला आहे, अशी भावना ब्राम्हण समाजातील मतदार व्यक्त करू लागला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार गिरीश बापट यांना पुन्हा उमेदवारी मिळणे अवघड आहे.
त्यामुळे पुढील वर्षभरात भाजप कडून उरणारा ब्राम्हण चेहेरा देखिल लोकसभेत अथवा विधिमंडळात दिसणार
नाही असा समज पक्का झाल्याने शहरात बॅनर झळकू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title :-Pune Kasba Peth Bypoll Election | After Medha Kulkarni, Mukta Tilak, Girish Bapat’s constituency also went? BJP’s headache increased as the displeasure of the Brahmin community in Pune came to the fore through the banner fight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…