Pune Kasba Peth Bypoll Election | ‘महाविकास आघाडी’चे रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ अजित पवारांचा भव्य ‘रोड शो’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने कसब्यातून काँग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थित रोड शो (Roadshow) करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कसब्यात शंभर टक्के परिवर्तन होईल असा विश्वास बोलून दाखवला. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून यावेळी कसब्यात निश्चितपणे बदल होईल. जनतेला बदल हवा आहे. कारण दोन दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. विशेत: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) बाबतीत जे घडले आहे याचा राग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल आणि शंभर टक्के परिवर्तन होईल. कसब्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला.

रवींद्र धंगेकर यांच्या रोड शोची सुरुवात शनिवारवाडा येथून करण्यात आली. तेथून पुढे लालमहाल चौक, दारुवाला पूल,
अपोलो टॉकीज, आर.डी. हायस्कूल, नाना चावडी चौक, हिंदमाता चौक, नाना पेठ, पिंपरी चौक, पालखी विठोबा चौक,
जनाई मळा, लोहियानगर पोलीस चौकी, फायर ब्रिगेड, घोरपडे पेठ पोलीस चौकी, सिंहगड गॅरेज, शितळा देवी,
जैन मंदिर काची आळी, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट, फडगेट पोलीस चौकी, राष्ट्रभूषण चौक, हिराबाग,
महाराणा प्रताप उद्यान, एस.पी. कॉलेज, टिळक रोड, नवी पेठ, गांजवे चौक, सेनादत्त पोलीस चौकी, राजेंद्र नगर,
म्हसोबा चौक, अमरज्योत मित्र मंडळ, दांडेकर पूल, अलका चौक, माती गणपती, केसरी वाडा शिंदेपार, गाडगीळ वाडा,
मंदार लॉज, रमणबाग, आप्पा बळवंत चौक सोमवंशी आर्य़ क्षेत्रिय समाज कार्यालय मुख्य कचेरी येथे समाप्ती झाली.
यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Ajit Pawar’s grand ‘road show’ to promote Ravindra Dhangekar of ‘Mahavikas Aghadi’ (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा

Ashok Chavan | माझा घातपात घडवण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ