Pune Kasba Peth Bypoll Election | आनंद दवेंकडून केवळ आणि केवळ भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार होतोय; हिंदू महासंघ आणि ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा आरोप, यापुढे दवे यांचा प्रचार न करण्याची भूमिका (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने टिळक कुटुंबावर अन्याय केल्याचा आरोप करत आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता आनंद दवे यांच्याकडून एखाद्या पक्षाच्या विरुद्ध आणि एखाद्या पक्षाच्या बाजूने प्रचार केला जात असल्याचा आरोप हिंदू महासंघ आणि ब्राम्हण महासंघाच्या काही पदाधिकार्‍यांनी केला आहे. यापुढे दवे यांचा प्रचार न करण्याची भूमिका हिंदू महासंघ (Hindu Mahasangh) आणि ब्राह्मण महासंघाच्या (Brahman Mahasangh) काही पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती रोहित धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

रोहित धोत्रे म्हणाले, हिंदू महसंघ ही पोटनिवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवण्यासाठी जी तयारी करालाय पाहिजे होती, ती तयारी न करता हिंदू महासंघ ही निवडणूक लढवत आहे. हिंदू महासंघ हा हिंदूंसाठी लढणारा आहे. मात्र आता असे दिसून येत आहे की प्रचाराच्या सुरुवातीला किंवा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी असे वाटत होते की आपण हिंदूंसाठी लढत आहोत. मात्र यानंतर ज्या प्रकारे प्रचार सुरु झाला आहे त्यानुसार हा प्रचार एका बाजूने सुरु झाल्याचे दिसत आहे. म्हणजे एखाद्या पक्षाच्या विरुद्ध आणि एखाद्या पक्षाच्या बाजूने हा प्रचार सुरु झाला असं मला वाटत असल्याचे रोहित धोत्रे यांनी सांगितले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

धोत्रे पुढे म्हणाले, हिंदूंचा उद्धार करायचा असेल तर एका कुठल्या पक्षाला डावलून किंवा एखाद्या हिंदुत्ववादी माणसाला डावलून दुसरा जो हिंदुत्ववादी पक्ष नाही, त्यांच्याबरोबर जाणं किंवा त्यांना मदत होईल यासाठी त्यांच्या अजेंड्यावर काम करणं हे चुकीचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात भाजपकडून विचारणा झाली होती की आपण एकत्र काम करु एकत्र लढू. राष्ट्रीय हिंदुत्ववादी पक्षाकडून अशी विचारणा करण्यात आल्यानंतर देखील त्यांना डावलून स्वत:ची गाडी पुढे रेटण्याचं काम सध्या सुरु असून ते पदाधिकाऱ्यांना पटलं नसल्याचे धोत्रे यांनी सांगितले.

भाजपच्या विरोधात प्रचार केला जात आहे
यावेळी धोत्रे यांना कोणत्या पक्षाचा अजेंडा होता असा प्रश्न विचारला असता धोत्रे म्हणाले, असं वाटतंय की जे दुसरे पक्ष आहेत जसे राष्ट्रवादी काँग्रस, काँग्रेस सारखे पक्ष आहेत त्यांचा अजेंडा फॉलो होत असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी प्रचाराला सुरुवात झाली आणि आता जो प्रचार होत आहे तो हेमंत रासने यांच्या विरुद्ध होत असल्याचे दिसत आहे. हा प्रचार हिंदू महासंघ विजयी व्हावा यासाठी होताना दिसत नाही. तर हा प्रचार भाजपचा उमेदवार पडावा म्हणून प्रचार केला जात असल्याचे दिसत आहे.

 

फूट पडली नाही पण
तुम्ही भाजपसोबत जाणार का असे विचारले असता धोत्रे म्हणाले, अद्याप तरी असा कोणताही मुद्दा आलेला नाही. जे मुद्दे होतात ते आनंद दवे यांच्यापर्यंत असतात. ते मुद्दे तिकडेच संपतात. सगळे मुद्दे आमच्या पर्यंत येत नाहीत. पक्षात फुट पडली आहे का असे विचारले असता धोत्रे म्हणाले, फूट पडली नाही पण माझा विचार मी सांगितला. बाकिचे त्यांच्याबरोबर आहेत.

 

केवळ आणि केवळ भाजपला टारगेट केलं
ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सुयोग तांबोळी, म्हणाले स्वत:च्या संघटनेचा अंजेडा सोडून तुम्ही एखाद्या पक्षाला मदत
व्हावी आणि एखाद्या पक्षाला त्रास व्हावा अशा विचाराने वागत असाल तर पदाधिकारी, कार्यकारिणी नाराज होणारच.
ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दाखल केली त्यावेळी तुमच्यासमोर 16 उमेदवार असून तुमचे 15 विरोधक झाले.
यांनी आतापर्यंतच्या प्रचारात इतर कोणत्याही उमेदवाराचा अपप्रचार केला नाही.
त्यांनी केवळ आणि केवळ भाजपला टारगेट केलं. त्यांचं मत हे ब्राह्मण समाजाचं मत होऊ शकत नाही.
ब्रह्मण माणूस सूज्ञ असून तो विचारसरणीला मदत करतो जातीवादाला मदत करत नाही.

 

भाजपचं ब्राह्मणाचं मतदान तोडण्यासाठी…
मुख्य उमेदवार सोडले तर इतर उमेदवाराच्या विरोधात तुम्ही आजपर्यंतच्या प्रचारात बोलला नाही.
यापूर्वीच्या अडीच वर्षाच्या शासनाच्या काळात रस्त्यावर कधी उतरलात का? आता स्पष्टपणे जाणवत आहे की,
तुम्ही एखाद्या पक्षाची बाजू घेत आहात आणि एखाद्या पक्षाला तोडण्यासाठी भाजपचं ब्राह्मणाचं मतदान तोडण्यासाठी म्हणा,
हिंदुत्वाचं मतदान तोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप तांबोळी यांनी आनंद दवे यांच्यावर केला आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Anand Dave is campaigning only and only against the BJP candidate; Accusation of Hindu Federation and Brahmin Federation office bearers, role of no longer campaigning for Dave (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या