Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस भाजपबरोबरच हिंदू महासंघाचा ‘हा’ उमेदवार लढणार निवडणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक (Pune Kasba Peth Bypoll Election) जाहीर झाली आहे. याकरिता सत्ताधारी भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, कसबा विधानसभा मतदारसंघात (Pune Kasba Peth Bypoll Election) टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे टिळक कुटुंबात आणि त्यांच्या समर्थकांत नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे. तसेच टिळक कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्यामुळे ब्राम्हण समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. आणि याच मुद्याला केंद्रस्थानी ठेवत हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) कसबा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उतरविण्याचे जाहीर केले आहे.

सत्ताधारी भाजपकडून कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Bypoll Election) टिळक कुटुंबियांना डावलण्यात आले. टिळक कुटुंबियांऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत रासने हे खासदार गिरीष बापट यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यातच आता हिंदू महासंघाच्या एका नेत्याने देखील निवडणुक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी देखील कसबा पोटनिवडणुक
(Pune Kasba Peth Bypoll Election) लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे आता काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
आनंद दवे हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हिंदू महासंघाचे उमेदवार असणार आहेत.
आनंद दवे हे लवकरच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुक आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे देखील यावेळी बोलताना दवे म्हणाले.
त्यामुळे आता कसबा विधानसभा पोटनिवडणुक तिरंगी होणार आहे.

यावेळी बोलताना हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले की, ‘कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून
ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी आहे. भाजपकडून चिंचवड मतदारसंघात न्याय तर कसब्यात अन्याय केला गेला आहे.
मात्र हिंदू महासंघ ही निवडणुक लढविणार असून आम्ही मंगळवार (दि.०७) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.
खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहचविण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणं आणि स्वच्छ,
सुरक्षित आणि सभ्य कसबा हेचं ही पोटनिवडणुक लढविण्यामागचं आमचं ध्येय असणार आहे.
असंही यावेळी बोलताना दवे म्हणाले.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | bjp congress tension increased in the town this candidate will contest the election from the hindu mahasangh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील संगीत पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 16 | प्रेक्षकांसमोर डान्स करताना ‘शालीन – अर्चना ‘चा तोल गेला अन्…

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी

Pune Kasba Peth Bypoll Election | टिळक कुटुंबियांच्या भेटीनंतर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची BJP वर टीका, म्हणाले – ‘…तर पुणेकरचं भाजपला त्यांची जागा दाखवतील’