Pune Kasba Peth Bypoll Election | रोड शोनंतर हेमंत रासनेंचा PMPML मधून प्रवास, मतदारांशी साधला संवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराला वेग आला आहे. भाजपने (BJP) कसबा राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून उमेदवारी (Pune Kasba Peth Bypoll Election) जाहीर झाल्यापासून रासने यांनी मतदारांच्या गाठी भेटीवर भर दिला आहे.

 

https://www.facebook.com/photo?fbid=626289746171495&set=pcb.626291799504623

 

 

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा  प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. उमेदवार प्रचार करताना वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी तर थेट ‘पुण्यदशम्’ या पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करत मतदारांना मतदानासाठी साद घातली. रासने यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात आलेली पुण्यदशम ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झालीय. या योजनेतून 10 रुपयात शहरभर आणि तोही दिवसभर प्रवास करता येत आहे. रासने यांनीही रांगेत उभारुन 10 रुपयांचे तिकीट काढत प्रवास केला

दरम्यान महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे
(Pankaja Munde) यांनी सोमवारी (दि.20) मतदारसंघातून पदयात्रा काढली.
यावेळी त्यांनी स्थिरसरकार आणि विकासाच्या मुद्यावर मतदार भाजपला मतदान करतील असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. रोड शो नंतर हेमंत रासने यांनी मंगळवारी पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
असलेल्या पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | BJP hemant rasens journey through pmpml pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Crime News | सोने घडवण्याच्या बहाण्याने ३१ लाखांचा ऐवज घेऊन कारागीर फरार; कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना

MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर