Pune Kasba Peth Bypoll Election | ‘हे भाजपचं कसबा आहे, काँग्रेसचा उमेदवार….’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचाराला अवघे काही तास शिल्लक आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते कसब्यात तळ ठोकून आहेत. गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) कडाडून टीका केली. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

या रोडशोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, कुणाल टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) अनेक अप्रचार करण्याचे प्रयत्न केले. विविध समाज नाराज असल्याचे सांगितले, पण तसं काहीही नाही. कसबा हा हिंदुत्ववादी आहे, हे छत्रपती शिवरायांचे पुणे आहे. हे भाजपचे (BJP) कसबा आहे, बापट यांनी कसबा मतदारसंघ बांधला आहे. याठीकणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.

भाजपचा कार्यकर्ता कसा असतो हे गिरीश बापट (Girish Bapat) यांच्याकडे बघून लक्षात येईल. आजारी असताना देखील त्यांनी पक्षासाठी बैठक घेतली. त्यांच्या आवाहनावर आता आपल्याला येत्या 26 तारखेला हेमंत रासने यांना मतदान करुन ही निवडणूक जिंकायची आहे. विरोधकांनी या निवडणुकीत अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

 

फडणवीस पुढे म्हणाले, ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत.
काँग्रेसच्या उमेदवाराला पुणेश्वर महादेवाबाबत भूमिका विचारा.
या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मतांचे धृवीकरण केले जात आहे.
तसेच एमपीएससीच्या आंदोलनाबाबत (MPSC Youth Agitation) त्यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचे सांगत निर्णय
यांनी घ्यायचे आणि त्या चुकीच्या निर्णयावर आण्ही निर्णय घ्यायचे.
त्याही पुढे जाऊन हे निर्णय आम्हीच कसे घेतो हे ही सांगायचे काम विरोधक करत असल्याचा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

 

जातीयवादी विधान पवारांच्या बैठकीत
शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल बैठक घेतली. त्यांच्या बैठकीतमध्ये एक नेता म्हणतो,
मोदींना आणि आरएसएसला (RSS) हरवण्यसाठी देशभरातील मुसलमान आणू, मेलेला मुसलमानही येईल,
असं जातीयवादी विधान पवारांच्या बैठकीत झाल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कसबा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन करताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहूजी वस्ताद आणि महात्मा फुले यांचे विचार सांगणारे असल्याचे सांगितले.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | BJP leader and DCM devendra fadnavis has criticized congress in kasba by election campaign

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

Pune Kasba Peth Bypoll Election | धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार – मोहन जोशी