Pune Kasba Peth Bypoll Election | ‘भाजप-सेना सरकारवरील विश्वास सिद्ध करण्यासाठी कसब्यात मोठे मताधिक्य मिळविणार’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | संपूर्ण महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना सरकारवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे, प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवायचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या प्रचारार्थ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

पाटील पुढे म्हणाले, आम्ही सर्वजण ताकतीने या निवडणुकीत उतरलो आहोत कारण प्रत्येक गोष्ट नीट व ताकतीने करायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रचार कार्यात सहभागी झालो आहोत.

 

पाटील पुढे म्हणाले, ही जागा सोपी आहे. भाजपची परंपरागत आहे. ती प्रतिष्ठेची आहे. कारण परंपरागत जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायची आहे.

 

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो काढण्यात आला. या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो तरुण या रोड शोमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी या रोड शोचं स्वागत करण्यात आलं.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाने चांगली आघाडी घेतली असून,
भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ घरोघरी प्रचारासह सभा, पदयात्रा,
बाईक रॅली अशा विविध मार्गांनी मतदारांशी संपर्क केला जात आहे.
हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आले होते.
गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकासमोरुन रॅलीची सुरुवात झाली. अंगरशाह ताकिया, डांगे चौक, पालखी चौक,
हमाल तालीम, नटरंग मंडप, पिंपरी चौक, नानापेठ, नाना चावडी, लक्ष्मीरोड, सोन्या मारुती, फडके हौद, लाल महाल,
रतन टॉकीज, आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती आदी मार्गांवरुन हा रोड शो मार्गस्थ झाला. रॅलीचा समारोप कामगार मैदानात झाला.

 

या रॅलीला तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो तरुण रॅलीत आपली दुचाकी घेऊन सहभागी झाले होते.
तसेच ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं,
तर महिलांकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचं औक्षण करण्यात आलं.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | ‘BJP-Sena will get a big majority in Kasbay to prove their faith in the government’ – Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘येथे सोने, चांदी, पैसे स्विकारले जाईल, मत मात्र…’, कसब्यातील ‘त्या’ पोस्टरची शहरात चर्चा

IPL 2023 | CSK च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूचे टीममध्ये झाले पुनरागमन

Pune Crime News | विश्रांतवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई