Pune Kasba Peth Bypoll Election | ‘…तर आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ;’ कसबा पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे नाना पटोले यांना आव्हान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपने टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यामुळे आम्ही कसबा पोटनिवडणुक लढवत आहोत असे काल पुण्यातील काँग्रेस भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले होते. टिळक कुटुंबियांना उमेदवार न देण्यात आल्यामुळे आम्ही ही पोटनिवडणुक (Pune Kasba Peth Bypoll Election) लढवत आहोत. असे देखील ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे (BJP) नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाना पटोले यांचा चांगलाच समाचर घेतला आणि नाना पटोले यांना त्यांनी आज माध्यमांशी बोलताना थेट आव्हानचं दिले.

आज पुणे येथे आले असता माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आम्ही जगताप यांच्या घरातही उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस (Congress) तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का? मुळात काँग्रेसला पुण्यातील दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिळकांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक  बिनविरोध होईल हे घोषित करावं, असे आव्हान यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना दिले. तसेच, नाना पटोले जे म्हणत आहे, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही आहोत. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे.’ असे देखील यावेळी बोलताना ते म्हणाले.

दरम्यान, काल (दि.०५) माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की,
‘मला मुख्यमंत्र्यांचा (CM Eknath Shinde) फोन आला होता.
त्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी अशी विनंती केली.
मात्र, कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही कसब्याची जागा लढवणार
असल्याचे मी त्यांना सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती.
तसेच, प्रदेशाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत मी स्वत: लक्ष देत असून ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे.
‘ असे नाना पटोले हे काल पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | chandrakant patil replied to nana patole statement on kasbapeth byelection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

Satara Crime News | साताऱ्यातील ‘त्या’ खुनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश; दापोलीमधून आरोपींना अटक

Pune Crime News | स्त्रीधन, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम लांबवली; मुलीने आपल्याच वडिल, भावाविरुद्ध दिली तक्रार